तंबाखू उद्योगावर पुण्यात छापे ३३५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

Raids on tobacco industry in Pune reveals unaccounted assets worth Rs 335 crore
Raids on tobacco industry in Pune reveals unaccounted assets worth Rs 335 crore

नवी दिल्ली  : तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री आणि पॅकेजिंग करणाऱ्या पुण्यातील एका उद्योग समूहावर प्राप्तिकर खात्याने घातलेल्या छाप्यात ३३५ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती उघडकीस आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेच याबाबतची माहिती दिली आहे.

प्राप्तिकर विभागाने राज्यात मुंबई, पुणे आणि संगमनेरसह ३४ ठिकाणच्या विविध कार्यालयांवर १७ फेब्रुवारी रोजी शोध मोहीम आणि जप्तीची कारवाई केली. यावेळी एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. तसेच रिअर इस्टेटशी संबंधित व्यवहारातून ९ कोटी रुपयांचा फायदा मिळविण्यात आला. याची कोणतीही नोंद करण्यात आली नसल्याचे आढळून आले, असे प्राप्तिकर विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आतापर्यंत एकूण ३३५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीव्यतरिक्त हा उद्योग समूह एफएमसीजी आणि रिअर इस्टेट उद्योगातही असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. या शोध मोहिमेत, हस्तलिखित आणि कॉम्युटर वरील एक्‍सेल शीट्‌स मध्ये असलेल्या हिशेबांमध्ये २४३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख तंबाखू विक्री केल्याची माहिती आढळली. त्याशिवाय, काही तंबाखू उत्पादनांशी संबधित व्यवहारांची चौकशी करतांना, आणखी सुमारे ४० कोटी उत्पादनांची बेहिशेबी विक्री केल्याचेही आढळले.

बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवहारातही या उद्योगसमूहाने नोंदणीमूल्यापेक्षा अधिक रक्कम स्वीकारल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात १८ कोटी रुपयांचे रोखीचे व्यवहार झाल्याचे पुरावे आढळले आहेत. प्राप्तिकर कायद्याच्या ५० सी कलमाचे उल्लंघन करून जमिनीच्या व्यवहारातून २३ कोटी रुपयांचा भांडवली नफा मिळविल्याचेही शोध मोहिमेत आढळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com