रेल्वेच्या ॲपची डोकेदुखी

Railway-App
Railway-App

पुणे - रेल्वे प्रवाशांना बसल्याजागी तिकीट खरेदी करता यावे, यासाठी ‘इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिझम’मार्फत रेल्वेने (आयआरसीटीसी) ‘तिकीट ॲप’ सुरू केले आहे. मात्र, या ॲपवर तिकीट खरेदी केल्यानंतर अनेकदा ते रद्द होते. काही वेळा तिकिटाची श्रेणी बदलली जाते. तसेच रद्द झालेल्या तिकिटाचे पैसेही परत मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हे ॲप आता प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे.

तिकीट ॲपमुळे प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकावर रांगेत उभे राहण्याची गरज राहिली नाही. कोणत्याही ठिकाणावरून तिकीट बुक करण्याची सुविधा रेल्वेने दिली खरी, पण या सुविधेमध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर येत 
आहे. 

ॲपवरून तत्काळ श्रेणीचे तिकीट बुक केल्यानंतर ते तिकीट मिळाले तरी प्रीमियम श्रेणीचे पैसे कापले गेल्याची उदाहरणे आहेत. काही प्रवाशांनी ॲपवरून तिकीट बुक केल्यानंतर ते रद्द झाल्याचा मेसेज आल्याचे सांगितले. तसेच तिकीट रद्द झाल्यानंतर पुढील सात दिवसांमध्ये पैसे परत करण्यात येतील, असा मेसेज आला. मात्र, यातील काही प्रवाशांना त्यांचे पैसे परत मिळत नसल्याचेही समोर आले आहे.

ॲपवरून काही दिवसांपूर्वी ‘तत्काळ’मध्ये पुणे ते सिकंदराबाद तिकीट बुक केले होते. तिकीट बुक झाल्यावर खात्यातून पैसेही कापण्यात आले. मात्र, तिकीट रद्द झाल्याचा मेसेज आला आणि पैसे आठवड्याभरात मिळतील असे कळविण्यात आले. पण, अद्याप पैसे मिळालेले नाहीत.
- महेश शेळके, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com