रेल्वे स्थानकावर मिळेना ‘रेलनीर’

Rail-Neer
Rail-Neer

पुणे - रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वेच्या ‘रेलनीर’ पाण्याची विक्री करण्याची परवानगी देत अन्य ब्रॅंडचे पाणी विकण्यास बंदी घातली. मात्र, शहरातील शिवाजीनगरसह इतर स्थानकांवर ‘रेलनीर’चे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे परवानगी नसलेल्या ब्रॅंडचे पाणी सर्रासपणे विकले जात आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विभागीतील सर्व रेल्वे स्थानकांवर ‘रेलनीर’ पाण्याची विक्री करण्याची सक्ती केली. तसेच, ‘रेलनीर’ पाणी प्रवाशांनी १५ रुपयांना विकत घ्यावे, असे आवाहनही केले. यासंदर्भात एक पत्रक रेल्वे प्रशासनाने चार दिवसांपूर्वीच काढले. त्यामध्ये ‘रेलनीर’व्यतिरिक्त अन्य ब्रॅंडचे पाणी रेल्वे स्थानकांमध्ये विकण्यास बंदी घातली. मात्र, शहरातील शिवाजीनगरसह इतर रेल्वे स्थानकांवर ‘रेलनीर’चे पाणीच उपलब्ध नसल्याने प्रवाशांची पंचाईत झाली आहे.

स्थानकातील दुकानांमध्ये ‘रेलनीर’ उपलब्ध नसल्याने रेल्वेने परवानगी दिलेल्या ब्रॅंडसह परवानगी नसलेल्या ब्रॅंडचेही पाणी सर्रासपणे विकले जात आहे. स्थानकातील दुकानदारांना यासंदर्भात विचारले असता, प्रशासनाने ‘रेलनीर’ उपलब्ध करून दिले नाही. परिणामी, दुसऱ्या ब्रॅंडचे पाणी विकावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या पुणे विभागामध्ये सर्व स्थानकांवर ‘रेलनीर’ विकण्याची सक्ती केली आहे. मात्र, काही स्थानकांवर या पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास रेल्वेने इतर ब्रॅंडचे पाणी विकण्याची परवानगी दिली आहे. रेल्वेकडून सर्व स्थानकांवर पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com