आता रेल्वे स्थानकांवरही थाटता येणार स्टॉल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम असून रेल्वे मंत्रालय यासाठी विशेष परिश्रम घेत आहे.
Pune Railway Station
Pune Railway StationSakal
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम असून रेल्वे मंत्रालय यासाठी विशेष परिश्रम घेत आहे.

पुणे - स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, कलाकारांच्या कलेला वाव मिळावा, या हेतूने रेल्वे मंत्रालयाने देशभरातील निवडक ७५० रेल्वे स्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ (एक स्थानक-एक उत्पादन) हा उपक्रम राबवित आहे. यात पुणे स्थानकाचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे प्रशासन नाममात्र दरात म्हणजे दोन हजारात भाडे तत्वावर हा स्टॉल उपलब्ध करून देत आहे. ऑक्टोबर पासून हे स्टॉल ग्राहकांच्या सेवेत येतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम असून रेल्वे मंत्रालय यासाठी विशेष परिश्रम घेत आहे.

सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून हा उपक्रम देशभरातील ७५० स्थानकांवर राबविला जात आहे. यासाठी वेगळ्या पद्धतीची स्टॉल तयार केले जात आहेत. स्टॉल धारकांना केवळ त्यांच्या उत्पादनाची स्थानकावर विक्री करायची आहे. तसेच स्टॉलचे लाईट बिल भरावे लागेल.

स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या हेतूने ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ ही संकल्पना राबविली जात आहे. ऑक्टोबर महिन्यापासून पुणे स्थानकांवर या अंतर्गत विक्रीस सुरुवात होणार आहे. यासाठी खूप कमी भाडे आकारले आहे.

- बी के सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

या उत्पादनाना विक्रीस परवानगी

हस्तकला, कापड व हातमाग, पारंपरिक पोषाख व स्थानिक शेतीविषयक पदार्थ आदी प्रकारचे वस्तू वा उत्पादने विक्रीस रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. हे स्टॉल फलाटावर अथवा ज्या ठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. अशा ठिकाणी रेल्वेकडून उपलब्ध करून दिले जाईल.

पुणे विभागातील ११ स्थानकांवर स्टॉल

पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली, जयसिगपूर, हातकणंगले, सातारा, शिवाजीनगर, खडकी, पिंपरी,चिंचवड आदी स्थानकांवर यासाठीचे आयते स्टॉल असणार आहेत. मध्य रेल्वेच्या काही निवडक स्थानकांवर देखील अशा पद्धतीचे स्टॉल उपलब्ध असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com