रेल्वे तिकिटांसाठी ॲपला पसंती

Railway-Ticket-App
Railway-Ticket-App

एका वर्षात प्रवाशांची संख्या चार हजारांवरून ४४ हजारांच्या पुढे
पुणे - रेल्वे प्रवाशांना अनारक्षित तिकिटे ऑनलाइन पद्धतीने काढता यावीत, यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या ‘यूटीएस मोबाईल ॲप’ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ॲपद्वारे तिकिटे काढणाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहे. एका वर्षात ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांची संख्या चार हजारांवरून ४४ हजारांच्या पुढे गेली आहे.

एप्रिल २०१८ मध्ये या ॲपद्वारे चार हजार ९९ प्रवाशांनी तिकिटे काढली होती. तर, यंदा ही संख्या ४४ हजार २६६ वर पोचली आहे. या तिकीटखरेदीतून रेल्वे प्रशासनाला पाच लाख ७७ हजारांचा महसूल मिळाला. गेल्यावर्षी ॲपद्वारे तिकीटखरेदीतून रेल्वेला ५६ हजार रुपयांचा महसूल मिळाला होता. 

लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑनलाइन तिकीट खरेदी करता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने २०१८ मध्ये मोबाईल ॲप सुरू केले होते. या ॲपच्या जागृतीसाठी प्रशासनाने कार्यक्रमही घेतले होते. स्थानकांवरील प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी ॲपचा डेमोही दाखविला होता. याचा चांगला परिणाम वर्षातच दिसून आला.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे प्रवासी या ॲपला पसंती देत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वाणिज्य व्यवस्थापक करण सिंह, एम. मुरली यांनी पुणे, आकुर्डी, चिंचवड, खडकी, कासारवाडी, शिवाजीनगर, तळेगाव स्थानकावरील कर्मचाऱ्यांचा सत्कारही केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com