लोहमार्ग दुरुस्तीमुळे वेळापत्रकामध्ये बदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

देहूरोड ते चिंचवडदरम्यान आजपासून काम

देहूरोड ते चिंचवडदरम्यान आजपासून काम
पुणे, - देहूरोड ते आकुर्डी आणि आकुर्डी ते चिंचवड दरम्यानच्या मार्गावर मंगळवारी (ता. 21) रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे. हे काम पुढील मंगळवार (ता. 28) पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या एक्‍स्प्रेस गाड्या देहूरोड स्टेशनवर जादा वेळ थांबणार आहे. तर पुण्यातून लोणावळ्याला जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये बदल केला असून, या गाड्या चिंचवडपर्यंतच जाणार आहेत.

आठ दिवस दररोज तीन तास हे दुरुस्तीचे काम चालणार आहे. या कालावधीत येणाऱ्या नांदेड एक्‍स्प्रेस, कराईकल एक्‍स्प्रेस, बिदर एक्‍स्प्रेस आणि काकीनाडा एक्‍स्प्रेस या गाड्या देहूरोड स्टेशनवर 22 मिनिटे थांबणार आहेत. तर बिकानेर-कोचुवेली एक्‍स्प्रेस आणि नागरकोईल एक्‍स्प्रेस 12 मिनिटे थांबणार आहे. पुण्यावरून दुपारी एक वाजता लोणावळ्याला जाणाऱ्या लोकल चिंचवड स्टेशनपर्यंत जाणार आहेत.

Web Title: railway time table changes by railway line repairing