#SaathChal अंथुर्णेमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी

राजकुमार थोरात
रविवार, 15 जुलै 2018

वालचंदनगर : अंथुर्णे (ता.इंदापूर) येथे  संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतला ग्रामस्थाबरोबर वरुणराजानेही हजेरी लावली. बेलवाडी येथील पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोहळा झाल्यानंतर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निमगाव -केतकीच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला.

लासुर्णेमध्ये तोफांची सलामी देऊन पालखी सोहळ्याचे पंचायत समिती सदस्य अॅड.हेमंत नरुटे, सरपंच निर्मला अनिल चव्हाण, उपसरपंच सुहास भोसले, ग्रामपंचायत सदस्य नेताजी लोंढे, संतोष लोंढे, हर्षवर्धन लोंढे, वालचंद थोरात, मनोहर पाटील, पंकज निंबाळकर, राजेंद्र वाकसे, सचिन खरवडे यांनी स्वागत केले. येथील निलकंठेश्‍वर विद्यालयाच्या मुला-मुलींनी वाजत गाजत लेझिमाच्या तालावर पालखी  सोहळा गावामध्ये नेला.

जंक्शन येथे ही धुमधडाक्यामध्ये पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले, उद्योजक वसंत मोहोळकर, संजय शिंदे, कुंडलिक सोनवणे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा अंथुर्णे मध्ये दाखल झाला. गावामध्ये पालखी सोहळा येताच वरुणराज्याने हजेरी लावली.

पालखीचे स्वागत आबासो भरणे, युवराज म्हस्के, सरपंच अकला शिंदे,उपसरंपच उज्वला साबळे, भरणेवाडीचे उपसरपंच गुलाब म्हस्के, माजी सरपंच राहुल साबळे,तानाजी शिंदे,बाळासो गायकवाड ,श्रीमंत बरळ, शेखर काटे, नामदेव शिंदे, राघू गायकवाड यांनी केले. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा निमगाव केतकीकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.
 
Web Title: Rain are presence on the occasion of Saint Tukaram Maharajs Palakhi