भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

rain.jpg
rain.jpg

खडकवासला (पुणे) : मागील दोन दिवसांपासून कोकण घाट माध्याला पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाने जोर धरला आहे. मागील 24 तासात मुळशीतील आंबवणे येथे 145 तर, वेल्ह्यातील घिसर येथे 129मिलिमीटर पाऊस पडला आहे. मावळात खंडाळा येथे 103, वेल्हे येथे 90 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 


जिल्ह्यातील मुळशी, मावळ, भोर व वेल्हे या तालुक्यांमध्ये पाऊस पडत आहे. यामध्ये वेल्हे तालुक्यातील घिसर, मावळ तालुक्यातील खंडाळा व मुळशीतील ताम्हिणी, कुंभेरी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळशीतील आंबवणे येथे 145, कुंभेरी 108, भोर तालुक्यातील भुतोंडे येथे 88, भोरचे भाटघर धरण येथील कुरुंजी 74, ताम्हिणी 65, भीमाशंकराचे 59, वेल्हे भट्टी वाघदरा 77, जुन्नर तालुक्यातील आहुपे 69, पानशेत धरणातील शिरकोली 72,  मावळ कोळे 69, भोरमधील शिरगाव 74, टेमघर 51, लवासा दासवे 33, भोर हिरडोशी 60,  पानशेत 48, वरसगाव 46, वडिवळे 65, पवना 50, वेल्हेतील साखर 51, खडकवासला 25 मिलिमीटर पाऊस मागील 24 तासात पडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com