मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता 

Rain
Rain

पुणे - पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर असलेल्या ‘बुलबुल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. तसेच, पूर्व मध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. यामुळे शनिवारी (ता. ९) आणि रविवारी (ता. १०) कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 

मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. सोमवारनंतर गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. गेल्या २४ तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी तसेच मुंबई, पालघर परिसरात जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. राज्यात सर्वांत कमी तापमाननगर येथे १४.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

शहर परिसरात थंडी वाढू लागली 
पुणे शहर आणि परिसरात येत्या दोन दिवसांत आकाश अंशत: ढगाळ राहील. त्यानंतर पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. दिवसाच्या तापमानात किंचित वाढ होऊन ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. तर, सायंकाळनंतर तापमानात घट होऊन १८ अंश सेल्सिअसवर जाईल. त्यामुळे आता हळूहळू थंडी वाढत आहे. शहर आणि परिसरात शुक्रवारी (ता. ८) कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवारपासून तापमान कमाल ३१ आणि किमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com