शहर परिसरात पावसाचा कमबॅक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे - शहरात गेल्या महिन्यात दाखल झाल्यापासून नैॡत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) काही दिवस विश्रांती घेतली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा पावसाला सुरवात झाली. शहर परिसरात दुपारनंतर दमदार पावसाच्या सरी पडू लागल्या. रात्री उशिरापर्यंत त्या सुरूच होत्या. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे. 

मॉन्सून दाखल होऊन महिना झाला, तरी पावसाने अद्याप जोर धरलेला नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत पाहावयास मिळाले. त्यानंतर राज्यात आता पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे.  शहरात या महिन्यात चांगला पाऊस पडेल, अशी शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, धरणक्षेत्र आणि घाट माथ्यावर मात्र पावसाने गेल्या चार दिवसांपासून जोर धरला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या. शहरात संध्याकाळी साडेपाचपर्यंत ५ मिमी. पावसाची नोंद झाली.

ताम्हिणीमध्ये ९० मिमी, डोंगरवाडी १०० मिमी, लोणावळा परिसरात ९० मिमी पाऊस पडला.

राज्यात मुसळधार पावसाची शक्‍यता
राज्यातील बहुतांश भागात बुधवारी पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वरमध्ये ५८ मिमी, ७ नाशिकमध्ये २ कोल्हापूर, साताऱ्यामध्ये ६ मिमी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच पुढील दोन दिवसांत कोकणात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Web Title: Rain Comeback in Pune City