वादळी पावसाने जुन्नरला शेतकऱ्यांचे नुकसान

दत्ता म्हसकर
मंगळवार, 5 जून 2018

जुन्नर - वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने कुसुर ता.जुन्नर येथील शेतकऱ्याची पपईची बाग उध्वस्त झाली आहे. काही भागात काढणीस आलेला आंबा वाऱ्याने गळून खाली पडला आहे. तर केळी-माणकेश्वर येथे वाऱ्याने उडून आलेला पत्रा अंगावर पडल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.

जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात सोमवारी ता. 4 रोजी सांयकाळी वादळी वाऱ्यासह एक तास मुसळधार पाऊस झाला. वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमालाच्या नुकसानीच्या घटना घडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

कुसुर ता. जुन्नर येथील शेतकरी साईनाथ जगन्नाथ ढोले यांच्या पपईच्या बागेला वादळी पावसाचा फटका बसून जवळपास तीन लाखाचे नुकसान झाले असल्याचे ढोले यांनी सांगितले. ढोले यांच्या दोन एकर क्षेत्रावर 650 पपईची फळांनी लगडलेली झाडे होती. रमझान सण असल्याने या फळांना मोठी मागणी होती. बाजारभाव देखील चाळीस रुपये प्रति किलो मिळत होता. दोन वर्षे मेहनत करून जपलेल्या पिकाला वादळी पावसाचा फटका बसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने ढोले अडचणीत सापडले आहेत.

केळी माणकेश्वर ता.जुन्नर येथे वादळी वाऱ्याने जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाल्याने लक्ष्मण लिंबा लांडे वय 55 वर्षे हा शेतकरी जखमी झाला असून त्याच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.

Web Title: rain damages farm in Junnar