esakal | पुणेकरांनो, पुढील पाच दिवस रेनकोट, छत्रीसोबत ठेवा कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain Raincoat Umbrella IMD Maharashtra

पुण्यात पुढील पाच दिवस पावसाचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने(Rain) पुन्हा शुक्रवारी हजेरी लावली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. शहरात ०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने(Weather department) वर्तवली आहे. (Rain for next five days in Pune)

गेल्या काही दिवसांपासून शहरात उकाडा वाढला आहे. दुपारनंतर उष्णता आणखी वाढत असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. शुक्रवारी सकाळी ऊन तर दुपारनंतर कात्रज, कोंढवा रस्ता, रामटेकडी, वैदूवाडी, हडपसर, सिंहगड रस्ता अशा विविध ठिकाणी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे काही काळासाठी पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली. शनिवार (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) शहरात मध्यम स्वरूपाच्या तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारपर्यंत (ता. २०) शहर आणि परिसरात हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हेही वाचा: पुणे RTO ला यंदाही फटका;१४ दिवसांत फक्त चार कोटी महसूल

सध्या अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा २४ तासांमध्ये ‘ताऊते’ या चक्रीवादळात रुपांतरीत होईल. या चक्रीवादळाचा प्रवास १६ ते १७ मे दरम्यान महाराष्ट्र किनारपट्टीच्या समांतर दिशेने असेल; परंतु हे महाराष्ट्र किनारपट्टीला धडकणार नाही. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीलगतच्या भागात मुसळधार पावसाचा तर राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने नमूद केले. तर पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात वाऱ्याचा वेग हा ६२ ते ९१ किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ऑनलाइन सोने खरेदीतून पुणेकरांनी साधला अक्षयतृतीयेचा मुहूर्त

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

loading image
go to top