

Rain Updates
पुणे - बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात १४ सप्टेंबरपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे. मोठ्या खंडानंतर पावसाचे आगमन होत असल्याने राज्यातील, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.