पवनेच्या पुराच्या पाण्याने केली सांगवीकरांची जलकोंडी

रमेश मोरे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेले जुनी सांगवी हे  मुळा व पवना या दोन नद्यांच्या कुशीत वसलेले आहे. शनिवार ता.३ मध्यरात्रीपासून मुळशी व पवनाधरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने येथील  मुळा व पवनेने धोक्याची पातळी ओलांडल्याने येथील नदी किनारा रहिवाशी भागात अनेक घरांमधून पाणी पाण्याने प्रवेश केला.

मुळा व पवना नदीकिनारा रहिवाशी भागात घरात पाणी
जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेले जुनी सांगवी हे  मुळा व पवना या दोन नद्यांच्या कुशीत वसलेले आहे. शनिवार ता.३ मध्यरात्रीपासून मुळशी व पवनाधरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने येथील  मुळा व पवनेने धोक्याची पातळी ओलांडल्याने येथील नदी किनारा रहिवाशी भागात अनेक घरांमधून पाणी पाण्याने प्रवेश केला.

मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान प्रथम येथील मुळानगर झोपडपट्टीत पाणी घुसले पुराची संभाव्य धोक्याची माहिती असूनही प्रशासनाकडून केवळ पाहणी खेरीज रात्री कुठलीही उपाययोजना अद्ययावत ठेवण्यात आली नव्हती. यामुळे ऐनवेळी नागरिकांची तारांबळ उडाली तोकड्या यंत्रणेमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेऊन रस्त्यावर उभे राहावे लागले येथील मधुबन सोसायटी, मुळा नगर झोपडपट्टी, पवनानगर घाट जम चाळ, प्रियदर्शनी नगर, शितोळेनगर शिवांजली कॉर्नर, ममतानगर, संगमनगर, दत्तआश्रम आदी भागात पुराचे पाणी रहिवाशी भागात घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. संभाव्य धोक्याची कल्पना असूनही प्रशासनाकडून नदी किनारा भागात धोक्याच्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था,नागरीकांचे स्थलांतर  आदी पूर्वनियोजन  करण्यात आले नाही.

आवश्यक साधनांची उपलब्धता नसल्याने नागरिकांना रस्त्यावर सामानसुमान घेऊन उभे राहावे लागले. यातच विजेचा लपंडाव, वाढणारे पाणी यामुळे सांगवीकर यांची चांगलीच दैना उडाली. पहाटे पाच नंतर प्रशासनाकडून मधुबन सोसायटी मुळानगर झोपडपट्टी भागात दोन अग्निशामक दलाच्या गाड्या, आरोग्य विभाग स्थापत्य, विभाग कामाला लागले. येथील मुळानगर झोपडपट्टीवासीयांना तात्काळ पालिकेच्या अहिल्याबाई होळकर शाळेत स्थलांतर करण्यात आले  सकाळी आठपर्यंत अनेक नागरिकांना मदत न मिळाल्याने  नागरिकांची दैना झाली. येथील  मुळा नदी किनारा भागातील  पवनानगर घाटाजवळील जम चाळीत सकाळी आठपर्यंत  घरातील सामानसुमान काढण्यासाठी नागरिकांना मदत मिळाली नसल्याने तारांबळ उडाली.मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सांगवीचा मुळानदी किनारा रस्त्या जलमय झाला.तर ठिकठिकाणी चेंबर तुंबल्याने घरांमधून पुराच्या पाण्यासोबत मिश्रित पाणी घरात घुसले.

सुस्त प्रशासन, लोकप्रतिनिधींची बेफीकीरी -
संभाव्य धोका माहित असूनही मुळा व पवनानदी किनारा रहिवाशी भागात यंत्रणा अद्यायवत नव्हती.पहाटे सकाळनेच प्रथम पाठपुरावा केल्यावर प्रशासनाकडून यंत्रणा जागी करण्यात आली.तर काही अपवाद वगळता स्थानिक लोकप्रतिनिधींचीही डोळेझाक दिसली.

भ्रमाचा भोपळा फुटला -
जागोजागी मुळानदीपात्रालगत टाकलेले भराव-राडारोडा पुरपरिस्थितीने मुळेच्या मुळावर उठला. मुळा पवनेच्या पात्रात टाकण्यात आलेले माती,राडारोडा भराव-यामुळे अनेक ठिकाणी अरूंद झालेले पात्र-उंच सखल भाग व प्रशासनाची याकडे झालेली डोळेझाक झालेल्या जलकोंडीचे एक कारण असल्याचे नागरीकांमधून बोलले जाते.

ह प्रभाग अधिकारी व यंत्रणेचे फोन
पहाटे तीन ते चारच्या सुमारास संपर्क क्षेत्राच्या बाहेर स्थानिक लोकप्रतिनिधी संतोष कांबळे यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी फोनाफोनी केली मात्र अधिकारी तात्काळ उपलब्ध होवू शकले नाहीत.

ड्रेनेज तुंबले अनेक घरात पुराच्या पाण्यासोबत मैलामिश्रित पाणी -
सकाळी ६ पासुन यंत्रणा झपाट्याने कामाला लागली. आरोग्य, स्थापत्य, आपत्ती  नियंत्रण विभाग, स्थानिक मंंडळे, कार्यकर्त्यांनी नागरीकांना मदत केली.

मुळानगर झोपडपट्टीत माझ्या बहीणीची झोपडी आहे.आम्हाला सकाळी उशीरापर्यंत कुणाकडूनही मदत मिळाली नाही.
- अक्षय चव्हाण, तरूण

आमची चाळ अर्धी पाण्याखाली गेली.पवनाघाटावरून मुळानदीचे पाणी घरात घुसले.आमची साहित्य काढण्यासाठी तारांबळ उडाली.शेजा-यांनी एकमेकांना मदत केली. सकाळपर्यंत ईकडे कुणी मदतीला आले नाही.
- चंचल शेवरे

मुळा नदी किनारा रस्त्याला तलावाचे स्वरूप शिवांजली कॉर्नर शितोळेनगर ते आनंदनगर पर्यंत रस्ता जलमय-
सततच्या विजेच्या लपंडावाने नागरीकांमधे होतहोती घबराट
कष्टकरी मजूरांचे हाल
सांगवीकरांची जलकोंडी
पवना नदी किनारा भागातील स्मशानभूमी, वेताळमहाराज उद्यान, दशक्रिया विधीघाट पाण्याखाली
साई चौक ते माहेश्वरी चौकातील भूमिगत नाला तुंबल्याने पवनेच्या पाण्याने वर असलेल्या जॉगींग ट्रँकवर घुसखोरी केली.
मधुबन सोसायटी अरूंद गल्ल्यामुळे अग्निशामकदलाची गाडी पोचण्यास करावी लागली कसरत शर्यतींचा अडथळा यामुळे उडालीसांगवीकरांची धांदल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Pawana River Flood Water Slum Area Loss