पुण्यात दोन दिवसांत पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

पुणे : यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची रविवारी नोंद शहरात झाली. पुण्यातील किमान तापमानाचा पारा 8.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून, राज्यात सर्वांत कमी तापमान नाशिक येथे 7.7 अंश सेल्सिअस नोंदले गेले. हा थंडीचा कडका पुढील तीन दिवसच राहणार असून, त्यानंतर पुण्यातील किमान तापमान दुपटीने वाढणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. येत्या बुधवारी (ता. 14) आणि गुरुवारी (ता. 15) शहर आणि परिसरातील काही भागांत पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट आहे. त्यामुळे तेथून गार वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्याचा थेट परिणाम पुण्यासह राज्याला हुडहुडी भरण्यात झाला आहे. रविवारी (ता. 11) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरातील किमान तापमानात सरासरीपेक्षा 3.1 अंश सेल्सिअसने घट झाली. तर कमाल तापमानाचा पारा एक अंश सेल्सिअसने वाढून 29.8 अंश नोंदला गेला.
बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या वर्दा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या (ता. 12) पासून पुढील दोन दिवस हवामान अंशतः ढगाळ राहणार असून, त्यानंतर पावसाची शक्‍यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Web Title: rain prediction in pune