शहरात मेघगर्जनेसह आज पावसाच्या सरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

पुणे - ‘वायू’ चक्रीवादळामुळे पुण्यात आकाश ढगाळ होते. दुपारनंतर पावसाच्या तुरळक सरींनी हजेरीही लावली. हे चक्रीवादळ गुरुवारी सकाळी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतरही त्याचा पुण्यावरील प्रभाव दिवसभर राहणार आहे. पुढील चोवीस तास आकाश ढगाळ राहणार असून, ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

शहरात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसने कमी होऊन ३१.२ अंश सेल्सिअस नोंदला गेला. चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर म्हणजे शुक्रवारपासून (ता. १४) कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढणार आहे.शहरात १ ते १२ जूनदरम्यान ५८.३ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा यादरम्यान आतापर्यंत ३४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा २४.१ मिलिमीटर पाऊस कमी पडला आहे. पडलेला हा पाऊस पूर्वमोसमी स्वरूपाचा असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट केले आहे.

धनकवडीत झाड कोसळले
कात्रज : धनकवडी परिसरातील ऊर्मिला सोसायटीत बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाड उन्मळून पडले. ते रस्त्यावर न कोसळता समोरच्या इमारतीवर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. उद्यान विभागाचे कर्मचारी आणि कात्रज अग्निशमन केंद्राचे प्रमुख संजय रामटेके, जवानांनी हे झाड कापून बाजूला केले. वाऱ्यामुळे ते कमकुवत झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in pune