पुणे शहरात दिवसभर पावसाची रिपरिप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे - पुणेकरांनी मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप अनुभवली. त्यामुळे छत्री आणि रेनकोट घेऊन नागरिक दैनंदिन कामे करत असल्याचे चित्र शहराच्या वेगवेगळ्या भागात दिसले. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात सहा मिलिमीटर आणि लोहगाव येथे दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारीदेखील सकाळपासूनच मध्यवस्तीतील पेठांसह उपनगरांमध्ये पावसाच्या सरींना सुरवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या. अधून-मधून एखादी पावसाची मोठी सर पडत होती. त्यामुळे रस्त्यांवर सर्वत्र पाणी साचले होते. 

शहरात 1 जूनपासून 21 ऑगस्टपर्यंत 410.2 मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. या वर्षी या दरम्यान आतापर्यंत 377.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील पावसाची सरासरी गाठण्यासाठी 32.9 मिलिमीटर पावसाची गरज असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्याच वेळी पुणे जिल्ह्यात मात्र सरासरीपेक्षा 33 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. वेल्हा, भोर, मुळशी, जुन्नर या भागात पावसाचा जोर असल्यानेही जिल्ह्याने सरासरी ओलांडल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. 

पावसाचा अंदाज 
शहर आणि परिसरात येत्या बुधवारी (ता. 22) पावसाच्या काही सरी पडतील, अशी शक्‍यता 51 ते 75 टक्के असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Web Title: rain in pune city