वरुणराजा बरसला; हवामान खातं म्हणतंय, 'राज्यात पुढील ३ दिवस...!'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

सध्या राज्यात वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे.

पुणे : राज्यातील काही भागांमध्ये बुधवारी (ता.२९) पावसाने हजेरी लावली. कालच हवामान खात्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार आज राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज विदर्भातील काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. तर गोव्यासह उर्वरित संपूर्ण राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. दरम्यान पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील तुरळक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे हवामान खात्याने नमूद केले आहे. त्यानंतर राज्यातील हवामान कोरडे राहील असेही सांगण्यात आले आहे. आज जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान होते. तेथे ४१.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

- Coronavirus : पुण्याच्या महापौरांचे पत्र व्हायरल; रोहित पवारांनी केला खुलासा

पुणे शहर आणि परिसरातील काही भागांमध्ये बुधवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. यामुळे किमान तापमानातसुद्धा किंचित वाढ झाली होती. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यावेळी सोसाट्याचे वारेसुद्धा वाहत होते. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता.

- #Lockdown2.0 : लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा 'या' विभागाला; वाचा सविस्तर

येत्या शुक्रवारपर्यंत शहर आणि परिसरात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहणार असल्याचा इशारा वेधशाळेमार्फत वर्तविण्यात आला आहे. आज शहरातील कमाल तापमान ४० अंश, तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे.

- आम्ही राजस्थानमध्ये अडकलो होतो, पण महाराष्ट्र सरकारने...

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले गेले आहे. सध्या राज्यात वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस म्हणजे शनिवारपर्यंत (ता.२) मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील तुरळक भागांमध्ये मेघागर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in some parts of State and for next three days Weather forecast Estimations