पुण्यात पावसाला सुरवात... (व्हिडिओ)

शुक्रवार, 1 जून 2018

पुणेः पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांमध्ये आज (शुक्रवार) सायंकाळी चारच्या सुमारास आलेला वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. पहिला पाऊस असल्यामुळे बच्चे कंपनी इमारतींच्या टेरेसवर भिजतानाचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.

रस्त्यांवरून दुचाकी चालक पावसाचा आनंद घेत आहेत. काही जण रस्त्याच्या कडेला उभे राहून पावसाचा आनंद घेत असल्याचे पहायला मिळत आहे. पावसामुळे गारवा निर्माण झाला असून, मातीचा सुगंध दरवळत आहे. खडकवासला, पानशेत रस्त्यावरील मालखेड, वरदाडे, निगडे परिसरात वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे झाड व वीज वहिनी रस्त्यावर पडली आहे. या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

जुनी सांगवीत वादळी वा-यासह आलेल्या पावसाने रस्त्यावरून पाणी वहात होते. गेली दोन दिवस प्रचंड उकाडा वाढला होता. सायंकाळी चारच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसाने रस्ते निर्मनुष्य झाले होते. नेहमी वर्दळीचे चौक मोठ्या पावसाने सुनसान झाले.

दरम्यान, अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्रामुळे मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी, दक्षिणअंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांत वेगाने प्रगती केली. कर्नाटकमधील शिराळी, हस्सन, मैसूरपर्यंतचा भाग मॉन्सूनने व्यापला आहे. देशाच्या दक्षिण भागात रविवारी (ता. 3) प्रगती करण्याची, तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागरातून मॉन्सून ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होणार असून, शुक्रवारी या भागात हजेरी लावणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात 6 जूननंतर पाऊस जोर धरणार असून, 6 ते 8 जूनपर्यंत महाराष्ट्रात मॉन्सून पोचणे शक्‍य आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य प्रदेशपासून पूर्व विदर्भ, तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

Web Title: rain starts in pune city