पुण्यात दोन दिवस हलक्या सरी बरसणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तसेच पुण्यात पुढील दोन दिवस पावसाच्या काही सरी हजेरी लावतील, असेही स्पष्ट केले आहे. पुण्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या हलक्‍या सरी हजेरी लावत होत्या. त्यामुळे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी १६८.२ मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी गेल्या ३५ दिवसांमध्ये १८२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा १४.५ मिलिमीटर जास्त पाऊस पडला.

Web Title: rain for two days in Pune