Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर कायम

तब्बल दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पुणे शहर व जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली.
Pune Rain
Pune Rainsakal

पुणे - तब्बल दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पुणे शहर व जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. बुधवारी पहाटेपासूनच शहरात पावसाची संततधार सुरू होती. तर घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. लोणावळा येथे दिवसभरात १०० मिलिमीटर, तर मगरपट्टा येथे ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोकण किनारपट्टीवरून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांमुळे पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवस जिल्ह्यात लोणावळा येथे २०० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. गुरूवार (ता.२०) आणि शुक्रवारी (ता.२१) पावसाचा जोर तुलनेने कमी होईल. त्यानंतर मात्र बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार झाल्यास पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः ढगाळ आणि बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बुधवारचा पाऊस (संध्याकाळी साडेपाच पर्यंत, मिलिमीटर) -

- लोणावळा - ९८

- लवासा - ३९

- तळेगाव - १०

- शिवाजीनगर - ५.८

- कोरेगाव पार्क - ५

- खेड, चिंचवड - ४

- हवेली, पुरंदर - ३

- शिरूर, राजगुरूनगर - ०.५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com