शंकरवाडी भुयारी मार्गाला ओढ्याचे स्वरूप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

पिंपरी : रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे कासारवाडी येथील शंकरवाडी भुयारी मार्गाला ओढ्याचे स्वरूप आले आहे. भुयारी मार्ग पाण्याने भरत आला आहे, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

पिंपरी : रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे कासारवाडी येथील शंकरवाडी भुयारी मार्गाला ओढ्याचे स्वरूप आले आहे. भुयारी मार्ग पाण्याने भरत आला आहे, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

पिंपळेगुरवला जाण्यासाठी शंकरवाडी भुयारी मार्गाचा वापर नागरिक करतात. अन्यथा कासारवाडी रेल्वेगेटावरून अर्धा किलोमीटरचा वळसा घालून नागरिकांना जावे लागते. भुयारी मार्गाजवळ दुचाकी व चारचाकी बंद पडलेल्या आहेत. चालकांनी वाहने त्या ठिकाणीच उभी केली आहेत. महापालिका प्रशासनाने अद्यापपर्यंत हा भुयारी मार्ग बंद केलेला नाही. नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने वेळीच या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

दोन वर्षापूर्वीच भुयारी मार्गाच्या जवळ असलेल्या शंकरवाडी नाला दुरूस्तीचे काम प्रशासनाने कले आहे. नाल्यातील पाणी वाहून रस्त्यावर येत असे, त्यामुळे नाल्याची उंची वाढवली होती. नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्यास पुराचे स्वरूप निर्माण होऊ शकते. या ठिकाणी थोडे पुढे गेल्यास कासारवाडी नाशिक फाटा नदी काठालगत व्यावसायिकांनी हॉटेल थाटल्याने नदीचा प्रवाह अडवला गेला आहे. त्यामुळे प्रवाहाचा दाब वाढल्यास धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या वर्षी पावसाच्या पाण्याच्या धोक्‍यामुळे नदीलगतच्या झोपडपट्ट्या हटविण्यात आल्या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain water enter in Shankarwadi subway at pimpari

टॅग्स