पावसाचे प्रमाण घटतेय

पावसाचे प्रमाण घटतेय

पुणे - शहरातील गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाऊस कमी होत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदले आहे. त्याच वेळी तीन वर्षांमधील सर्वांत नीचांकी जूनच्या पावसाची नोंद यंदा झाल्याचेही स्पष्ट केले. २४ जूनपर्यंत ४३.८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

पुण्यात सोमवारी मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर लोहगावला दमदार सरी पडल्या. परंतु, शहरात संध्याकाळी साडेपाचपर्यंत २.२ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या अठरा वर्षांमध्ये सर्वांत उशिरा आलेला हा मॉन्सून आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील गेल्या दहा वर्षांत जूनमध्ये पडलेल्या पावसाची आकडेवारीच्या विश्‍लेषणातून ही माहिती पुढे आली आहे. 

असा झाला दोन वर्षांमध्ये पाऊस कमी
पुण्यात जूनमध्ये सरासरी ११६ मिलिमीटर पाऊस पडतो. मॉन्सून २०१७ मध्ये १२ जूनला पुण्यात दाखल झाला. त्या वर्षी २०७.८ मिलिमीटर पाऊस झाला. २०१८ मध्ये ९ जूनला मॉन्सून पुण्यात आला. त्या वर्षी १४८ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे जूनचा पुण्यातील पाऊस दोन वर्षांपासून कमी होत असल्याचे निरीक्षण आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com