पावासामुळे आंबेगावातील आदिवासींचे जनजीवन विस्कळीत 

gohe dam
gohe dam

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले व ओढे भरून वाहत आहेत. त्यामुळे आदिवासी लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन दिवसात डिंभे धरणाच्या साठ्यात तब्बल 10 टक्के पाण्याची वाढ झाली आहे. सध्या धरणात 8.16 टीएमसी (57.31 टक्के) पाणी साठा झाला आहे. या पाणी साठ्यामुळे आंबेगाव, जुन्नर, शिरूर व नगर जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.     

आंबेगाव तालुक्यात डिंभे धरण असले, तरी या धरणातील पाण्याचा उपयोग आंबेगावबरोबरच जुन्नर, शिरूर तालुक्यांना लाभ होतो. हेच पाणी नगर व सोलापुर जिल्ह्याला जाते. नगर व सोलापूर हे दुष्काळे तालुके आता या पाण्यामुळे आठमाही बागायती झाले आहेत. या वर्षी योग्य नियोजन केल्याने धरणात 1 जूनला 20 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. जुन्नर तालुक्यात चार धरणे असली तरी या सर्व धरणांची पाणी साठवण क्षमता डिंभेपेक्षा कमी आहे. नगर व सोलापुरलाही कोणतेही तक्रार न करता पाणी सोडले जाते. डिंभे धरण दरवर्षी 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण भरते, असा इतिहास आहे. धरणातील पाणी साठ्यामुळे येथील शेतकऱ्यांची चिंता दुर झाली आहे.     

डिंभे धरणक्षेत्रात 11 ऑगस्ट रोजी 16 मिलीमीटर, 12 ऑगस्ट रोजी 5 मिलीमीटर, 13 ऑगस्ट रोजी 21 मिलीमीटर, 14 ऑगस्ट रोजी 47 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ११ ऑगस्ट रोजी धरणात 47.86 टक्के पाणी साठा होता. तीन दिवसात 10 टक्केवाढ होऊन तो 57.31 टक्के झाला आहे. पोखरी घाटातील गोहे पाझर तलाव भरून वाहत आहे. येथील भात शेती व निसर्ग सौंदर्य पहाण्यासाठी दरवर्षी पर्यटक येतात. परंतु, कोरोनामुळे निसर्गही लॉकडाऊन झाला आहे. आंबेगाव तालुक्यात घोडेगाव येथे 54 मिलीमीटर, डिंभे येथे 47 मिलीमीटर, मंचर 28 मिलीमीटर, कळंब येथे 26 मिलीमीटर, पारगाव येथे 29.99 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com