Pune News : रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बांधकाम मटेरिअल टेस्टिंग लॅबसाठी ‘एनएबी’ची मान्यता

बांधकाम करणाऱ्या कंपन्या अथवा संस्थांना सर्वसमावेशक सल्ला आणि संशोधनास ही हातभार लावता येईल.’
raisoni engineering college construction material testing lab nabl approval
raisoni engineering college construction material testing lab nabl approvalsakal

Pune News : जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (जीएचआरसीईएम) यांच्या बांधकाम मटेरिअल टेस्टिंग प्रयोगशाळेला नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅब’ने (एनएबीएल) मान्यता दिली आहे.

या चाचणी प्रयोगशाळेद्वारे बांधकामासाठीचे आवश्यक सिमेंट, स्टील, विटा आणि पेव्हिंग ब्लॉक्स यांसह बांधकाम साहित्यावर अनेक प्रकारच्या चाचण्या करता येणार आहे. यामुळे बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करता येणार आहे.

या प्रयोगशाळेद्वारे दिले जाणारे प्रमाणपत्र देश आणि राज्य सरकारच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या संरचनात्मक संस्थांसाठी वैध राहणार आहेत. ‘जीएचआरसीईएम’चे कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले,‘‘या मान्यतेमुळे पुणे आणि परिसरातील बांधकामांवरील सर्व प्रकारच्या आवश्यक चाचण्या या प्रयोगशाळेत करता येणार आहेत.

तसेच बांधकाम करणाऱ्या कंपन्या अथवा संस्थांना सर्वसमावेशक सल्ला आणि संशोधनास ही हातभार लावता येईल.’’ महाविद्यालयाचे तांत्रिक व्यवस्थापक डॉ. एस. जी. बन, गुणवत्ता व्यवस्थापक डॉ. ए. जी. डहाके यांच्यासह स्थापत्य अभियांत्रिकी संघाने ही मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com