esakal | लॉकडाऊन आवडे सरकारला; राज ठाकरेंनी साधला निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

राज्याचा राज्यकारभार कसा आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका होत आहे याबद्दल विचारले असता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

लॉकडाऊन आवडे सरकारला; राज ठाकरेंनी साधला निशाणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरेंबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बाबासाहेबांनी सोप्या शब्दात शिवचरित्र मांडलं, शिवकालीन आणि आजच्या शब्दांची योग्य सांगड घातली. आनंदी आहे पण समाधानी नाही असं बाबासाहेब म्हणाले होते. जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी नविन ऐकायला मिळालं. लहानपणापासून त्यांची व्याख्याने ऐकली. प्रत्येकवेळी ते फक्त शिवचरित्र सांगत नाहीत. आज आपण कसं सावध असलं पाहिजे, कसं जगायला हवं ते सांगतात असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचा राज्यकारभार कसा आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका होत आहे याबद्दल विचारले असता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणाले की, मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्री लोकांसाठी किती उपलब्ध आहेत याचं काही देणं घेणं नाही. पण लोकांना सर्व सेवा सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. आता रेल्वे प्रवासाबाबत मी बोललो होते. लसीकरण झालेल्यांना तरी प्रवास करू द्या. इतर राज्यात सुरु आहे पण आपल्याकडे बंद का? लोकांचे उद्योग बंद आहेत, नोकऱ्या गेल्यात, घर चालवता येईना असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: राज ठाकरेंनी सांगितला फडणवीस आडनावाचा अर्थ

सरकारकडून सातत्यानं निर्बंध लागू केले जात आहेत. लॉकडाऊन केलं जातंय यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, यांना काय जातंय लॉकडाऊन करायला. खरंतर यांना कोणी प्रश्न विचारायला नकोय, यांची अवस्था ही लॉकडाऊन आवडे सरकारला अशी झाल्याचंही त्यांनी म्हटलं.

ढिसाळ नियोजनामुळे महापूर

राज्याला गेल्या आठवड्यात महापुर, दरड कोसळण्याच्या दुर्घटनांचा मोठा फटका बसला. यात पाऊस जास्त पडला हे कारण आहेच पण इतर गोष्टी कोणत्या कारणीभूत ठरल्या असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, सरकारचं ढिसाळ नियोजनामुळे हे झालं. दरवर्षीचं आहे हे. कोल्हापूर, कोकणात होतं. धरण भरलं की वरून पाणी सोडतात आणि पूरस्थिती ओढावते. जगात इतर देशांमध्ये धरणातून पाणी सोडण्याआधी आठ दहा तास लोकांना अलर्ट केलं जातं. आपल्याकडे मात्र असं होतं नाही.

loading image
go to top