उमेदवार न सापडणे, हे भाजपचे दुर्दैव - राज ठाकरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - ""भाजपच्या लोकांना घोषणा करायची फार आवड. राज्य सरकार घोषणा करते, ती कामे करायला तितके पैसे राज्य सरकारकडे आहेत का? भाजप पूर्वीचा जनसंघ. 1952मध्ये जन्माला आलेल्या पक्षाला अजूनही उमेदवार सापडत नाहीत, हे त्यांचे दुर्दैव आहे,'' अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. 

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भांडारकर रस्त्यावरील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, रीटा गुप्ता या वेळी उपस्थित होते. 

मनसेचे नगरसेवक अन्य पक्षांत जात असल्याबद्दल ठाकरे म्हणाले, ""माझ्याकडे खूप कार्यकर्ते आहेत. जे घेऊन गेले, ते निवडून येणार आहेत का? मनसेच्या नगरसेवकांनी विकासकामे खूप केली. मी उद्‌घाटने करतो आहे, ते भूमिपूजन करीत आहेत. पुणे, नाशिक, मुंबई येथील मनसेच्या नगरसेवकांनी खूप कामे केली. नाशिकला आम्ही राबविलेले प्रकल्प पाहा.'' विरोधी पक्ष म्हणून पुण्यात तुमचा प्रभाव पडला नाही, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""मनसेने महापालिकेत व बाहेरही खूप आंदोलने केली.'' 

धर्म, जात यांच्याआधारे मते मागू नका, या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाकरे म्हणाले, ""देशाची विभागणी भाषावार प्रांतरचनेवर झाली आहे. माझी भाषा- मला मते द्या, असे कोणी म्हणत नाही. महाराष्ट्राची स्थिती वेगळी आहे. येथे परराज्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथील भाषा बोलायचे ते नाकारतात, तेव्हा संघर्ष होतो. राज्यातील रोजगार शंभर टक्के स्थानिक लोकांना का देत नाहीत. रोजगार येतो तेव्हा भाषा व इतर मुद्दे येतात. ते सर्वोच्च न्यायालयाने समजून घ्यावे. वस्तुस्थिती तपासून पाहा. ती न तपासता निर्णय देता, आम्ही कसे मानायचे?'' 

भाजपवर टीका करताना ते म्हणाले, ""तुमची सत्ता असताना तुम्हाला राममंदिर उभारता येत नाही. स्टेशनला काय नाव देता? त्या वेळी विटा व पैसे गोळा केले, आंदोलन केले. राममंदिर संघर्ष केला. त्यावर खासदार आले. आता ती भूमिका का बदलता? परवानगी दिली, भूमिपूजने केली पुढे काय? समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. यांना शिल्पकला माहिती आहे का? '' 

""नोटाबंदीचा आदेश फसला हे मोदी यांनी 30 तारखेला भाषण करतानाच्या बॉडी लॅग्वेजवरून दिसत होते,'' अशी टीका ठाकरे यांनी केली. 

गिरीश बापट यांच्यावर मते पडणार? 
""भाजपचे तीन वर्षांपूर्वी काय होते? कोठे होती भाजप तेव्हा. नरेंद्र मोदी यांच्यामुळे त्यांना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मते मिळाली. आताही त्यांना मिळतील ती मते मोदींमुळेच मिळतील. पुण्यात मते काय, गिरीश बापट यांच्यावर पडणार आहेत का,'' असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Web Title: raj thackeray press conference