
पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर राजकीय नेत्यांनाही चांगलीच भेडसावत असल्याचे चित्र समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही पुण्यातील कोंडीत गुरफटल्याचे दिसून आले आहेत. सोन्या मारुती चौकापासून फडके चौकापर्यंतचा अवघा पाच मिनिटांचा रस्ता पार करायला तब्बल २५ मिनिटे लागली. यावेळी पुणेकरांनाही मनस्ताप झाला आहे.