राज ठाकरेंच्या सभेची तारीख ठरली, आयोध्येला जाण्याआधी पुण्यातून रणशिंग फुंकणार

Raj Thackeray Pune Sabha
Raj Thackeray Pune SabhaSakal

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या (Pune) दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय रविवारी मनसेच्या (MNS) पार पडलेल्या मेळाव्या संदर्भातदेखील राज ठाकरे या दौऱ्यामध्ये आढावा घेणार आहेत. (Raj Thackeray Pune Sabha)

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुढील महिन्यातील पाच तारखेला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी पुण्यातून मनसेने रणशिंग फुंकलं आहे. यासाठी राज ठाकरे येत्या २१ मे रोजी पुण्यात सभा घेणार आहेत.

Raj Thackeray Pune Sabha
राज ठाकरे उद्यापासून पुणे दौऱ्यावर; शहर मनसेतील खदखद दूर करणार?

पुण्यातील राज ठाकरे यांची सभा नदी पात्राच्या रस्त्या लगत होणार असून यासंबंधी कार्यकर्त्यांनी तयारीला सुरुवात केलीय. पुण्यातील भिडे पुलाशेजरी नदी पात्राच्या रस्त्यालगत हा सोहळा पार पडेल.

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या सभेला राज्य सरकारचा कोणताही विरोध नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त सभेला परवानगी देतील, आणि नियम व अटींची माहिती देतील, असं त्यांनी सांगितलं.

पोलिसांकडून सभेस्थळाची पाहणी

मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांकडून मागितली होती परवानगी

पोलिसांनी नदी पात्राची पाहणी केली आहे

सभा नदी पात्रात होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com