‘स्मार्ट सिटी’मधून राजेंद्र जगताप कार्यमुक्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांना केंद्र सरकारने कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या पदाची सूत्रे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांच्याकडे सोपविण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.

पुणे - पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांना केंद्र सरकारने कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या पदाची सूत्रे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांच्याकडे सोपविण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. 

महापालिकेत यापूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करणारे जगताप यांची २०१७ मध्ये स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी केंद्र सरकारने प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली होती; परंतु प्रतिनियुक्तीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना कार्यमुक्त केल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. स्मार्ट सिटीमध्ये नियुक्तीवर असताना जगताप यांनी ई- बसच्या खरेदीला चालना दिली. तसेच स्मार्ट स्ट्रीट, प्लेसमेकिंग, स्मार्ट स्ट्रीट लाइट, स्मार्ट वीक, स्मार्ट क्‍लिनिक, मोफत वाय-फाय आदी प्रकल्प राबविले. जगताप यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटीला सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यातील ७५० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया जगताप यांनी पूर्ण केली आहे. संरक्षण विभागातून मूळ नियुक्तीस असलेल्या जगताप यांचा राज्यातील प्रतिनियुक्तीचा दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajendra jagtap workfree in smart city