पुणे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे - पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी ‘सकाळ’चे छायाचित्रकार विश्‍वजित पवार यांच्यासह रोहित आठवले यांची निवड झाली. सरचिटणीसपदी पांडुरंग सांडभोर, खजिनदारपदी ब्रिजमोहन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. 

चिटणीसपदी ‘सकाळ’च्या बातमीदार मीनाक्षी गुरव यांच्यासह विजय जगताप यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदी ‘ॲग्रोवन’चे संदीप नवले, ‘सकाळ’चे प्रसाद पाठक, नीलेश शेंडे यांच्यासह प्रशांत आहेर, सागर आव्हाड, चंद्रकांत हंचाटे, मंगेश पवार, अर्जुन शिरसाट, युगंधर ताजणे, दिलीप तायडे यांची बिनविरोध निवड झाली. ॲड. प्रताप परदेशी, ॲड. सुभाष किवडे व जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Web Title: Rajendra Patil President of Pune Press Association