

Fatal Assault Near Ghodegaon Liquor Shop
घोडेगाव : घोडेगाव पोलीस ठाणे हददीत 12 मे रोजी सकाळी घोडेगाव गावचे हददीतील देशी दारूच्या दुकानाच्या गेटजवळ झालेल्या मारहाणीत राजेंद्र रघुनाथ सहाने यांचा ग्रामीण रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मारहाण करून मृत्यूस कारणीभूत असणारे महेंद्र सुभाष शिंदे ( रा. घोडेगाव) याला या गुन्ह्यात घोडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.