बारामतीच्या राजेंद्र ठवरे यांनी विक्रमी वेळेत पुर्ण केला Trail Run

मिलिंद संगई
Saturday, 6 February 2021

प्रसिध्द ट्रेकर अरुण सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे आव्हान पेलायचा निर्णय झाला होता व हे यशही सर्वांनी सावंत यांनाच समर्पित केले. बारामतीतील योगिता काळोखे यांच्या प्लॅनेटिअर्स नेचर क्लबच्या माध्यमातून राजेंद्र ठवरे यांनी ही कामगिरी केली आहे.

बारामती : निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतानाच डोंगरदऱ्यातून आणि खिंडीतून धावून विक्रमी वेळेत अंतर पूर्ण करण्याचे आव्हान बारामतीचे ट्रेकर राजेंद्र ठवरे यांनी पूर्ण केले आहे. ट्रेल रन (निसर्गाच्या सान्निध्यात डोंगरदऱ्या खिंडीतून धावणे) करणारे ठवरे हे पहिलेच बारामतीकर ठरले आहे. बारामतीत ट्रेकिंग करणारे अनेक हौशी ट्रेकर्स आहेत, मात्र ट्रेल रनचे आव्हान ठवरे यांनी प्रथमच स्विकारले व त्यात ते यशस्वीही झाले. 

राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये : अजित पवार  
प्रसिध्द ट्रेकर अरुण सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे आव्हान पेलायचा निर्णय झाला होता व हे यशही सर्वांनी सावंत यांनाच समर्पित केले. बारामतीतील योगिता काळोखे यांच्या प्लॅनेटिअर्स नेचर क्लबच्या माध्यमातून राजेंद्र ठवरे यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांच्या पत्नी सोनाली ठवरे यांनी त्यांना या उपक्रमात मोलाची साथ दिली. अत्यंत खडतर अशा समजल्या जाणाऱ्या हाय वे टू हाय वे इगतपुरी ते जुन्नर अशा 74 कि.मी.चे डोंगर दऱ्या मार्गे अंतर विक्रमी 20 तास 30 मिनिटात पूर्ण करणारे ते पहिलेच बारामतीकर ठरले आहेत. 

इगतपुरी, अंबेवाडी झाप, अलंग मदन कोल, उडदवणे, साम्रद, रतनगड चौगुला, कात्राबाई खिंड, कुमशेत, पेठेचीवाडी,पाचनई, पिंप्र्याचा मळा,टोलारखिंड, खिरेश्र्वर, खुबी फाटा अशा चढ उताराच्या व खिंडीतून मार्गक्रमण करीत सूरज मालुसरे व राजेंद्र ठवरे यांनी हे अंतर विक्रमी वेळेत पूर्ण केले. रोहन मालुसरे, रूपेश तंवर,मिनेश कोळी, रीचेश पाखरे, सागर अमराळे, अवधूत अमराळे, संजय शेळके, सुनील पाटील, गणेश भिंताडे, अजित गोरे, राजेंद्र ठवरे, श्रीराम गायकवाड यांनीही हे अंतर पूर्ण केले. 

अखेर कात्रज-स्वारगेट बीआरटीमार्गावर धावली बस; पाहा व्हिडिओ

ठवरे यांनी या पूर्वी बारामती सायकल क्लबच्या माध्यमातून  काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग पूर्ण केले, बारामती ते शिर्डी सायकलिंग एका दिवसात,  सातारा हिल मॅरेथॉनसह अनेक मॅरॅथॉन कमी वेळेत पूर्ण केल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajendra Thore of Baramati completes trial Run and set Record time