

Rajesh Indore Ranks 43rd in MPSC Class 1; Emotional Scenes as Mother Sheds Tears of Happiness
Sakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर : चांडोली खुर्द (ता.आंबेगाव) येथील राजेश ज्ञानेश्वर इंदोरे हा शिक्षक दापत्याचा मुलगा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वर्ग एक परीक्षेत राज्यात ४३ वा आला आहे. राजेश आता सहाय्यक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यापैकी एका पदावर कार्यरत होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्याची फेटा बांधून रविवारी (ता.२) मंचर शहरातून सवाद्य मिरवणूक काढली. मुलाचे होत असले कौतुक पाहून आईचे डोळ्यांमध्ये आलेले आनंदाश्रू पाहून उपस्थित भारावून गेले.