

Keld Village 19 Year Old Woman Dies in Rajgad Taluka Velhe Police Register Accidental Death Case and Begin Investigation
esakal
वेल्हे(पुणे): राजगड तालुक्यातील केळद येथे १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (ता.२८) दुपारी दोनच्या सुमारास घडली. आदिती अशोक धुमाळ (वय १९, रा. केळद, ता. राजगड) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मृत तरुणीचा भाऊ शुभम अशोक धुमाळ यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.