

Pune Rajgad and Torna Fort Tourist Accidents Youth Falls 20 to 25 Feet While Taking Selfie Woman Also Suffers Serious Injury
esakal
-मनोज कुंभार
वेल्हे (पुणे): ऐतिहासिक किल्ले राजगड आणि तोरणागडावर रविवारी (ता. २९) दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन पर्यटक जखमी झाले. तोरणागडावर झुंजार माचीवर सेल्फी काढताना २२ वर्षीय तरुण सुमारे २० ते २५ फूट खोल गडाच्या आतील बाजूस कोसळून गंभीर जखमी झाला. तर राजगडावर पर्यटनासाठी आलेल्या ४८ वर्षीय महिलेला पायाला गंभीर दुखापत झाल्याने चालणे अशक्य झाले. दोन्ही ठिकाणी पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी, वेल्हे पोलीस आणि ट्रेकर्सनी प्रसंगावधान राखत स्ट्रेचरच्या साहाय्याने जखमींना गडाच्या पायथ्याशी आणून खाजगी रुग्णालयात दाखल केले.