

Fatal Bus Crash at Pabe Ghat: Rajgad Tour Ends in Tragedy for Mumbai Group
esakal
-मनोज कुंभार
वेल्हे,(पुणे): राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांच्या खाजगी बसचा (ट्रॅव्हलचा) राजगड तालुक्यातील पाबे घाटात भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर 19 जण जखमी झाल्याची घटना रविवार (ता. 28) जून रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली.