वेल्हे, (पुणे) - दुर्गम, डोंगरी व प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि बालवयातच वडिलांच्या अपघाती निधनामुळे तिच्या डोक्यावरचे छत्र हरवले, अशा अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत शिक्षण घेत पुढे जाण्याची जिद्द ठेवणारी राजगड तालुक्यातील पाबे शाळेची कन्या शुभ्रा नवनाथ रेणुसे हिने नासाकडे झेप घेतली असून राजगड तालुक्यातून निवड होणारी ती एकमेव विद्यार्थिनी आहे.