राजगुरूनगर नगरपरिषदेबाबत खळबळजनक बातमी

राजेंद्र सांडभोर
रविवार, 31 मे 2020

राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये झालेल्या मालमत्ता करातील ३९ लाख ७ हजार रुपयांच्या बहुचर्चित अपहारप्रकरणी नगरपरिषदेच्या ६ कर्मचाऱ्यांवर, नगरपरिषदेकडून अखेर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राजगुरूनगर : राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये झालेल्या मालमत्ता करातील ३९ लाख ७ हजार रुपयांच्या बहुचर्चित अपहारप्रकरणी नगरपरिषदेच्या ६ कर्मचाऱ्यांवर, नगरपरिषदेकडून अखेर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर अशोक मारणे, सुनील सीताराम भालेराव, आशा पंडित पोखरकर, गणेश बाळकृष्ण देव्हरकर, महेश विष्णू घुमटकर, काळूराम संभाजी नाइकरे या सहा कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी वेळोवेळी राजगुरूनगर नगरपरिषदेची कर वसुलीची व सर्वसाधारण वसुलीची रक्कम भरून घेऊन त्या रकमेची ग्राहकांना पावती दिली. मात्र कर स्वरूपात स्वीकारलेली एकूण ३९ लाख ७ हजार रुपयांची रक्कम, चलन न करता ती अप्रामाणिकपणे स्वतःकडे ठेवून त्या रकमेचा अपहार केला.

हेही वाचा- कामगारांसाठी ब्युरो स्थापन करणार, तर धमकविणाऱ्यांविषयी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले...

तसेच नगरपरिषदेची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी युवराज विरणक यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. खेड पोलिसांनी भा. द. वि. कलम ४२०, ४०९, ४०३ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी पुढील तपास करीत आहेत.

प्रकरण काय...स्थानिक निधी लेखापरीक्षकांकडून करण्यात आलेल्या, राजगुरूनगर नगरपरिषदेच्या २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाच्या विशेष लेखापरीक्षणात गंभीर बाबी आढळल्या होत्या.  मालमत्ता कर व अन्य जमा रकमांपैकी सुमारे ७७ लाख रुपयांची रक्कम नगरपरिषदेकडे जमा न करता अपहार केल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर काही रक्कम संबंधितांकडून पुन्हा भरण्यात आली. दरम्यान दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चार नगरसेवक आणि भीमशक्ती संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांनी मागण्या, निवेदने आणि आंदोलने केली होती. याप्रकरणी शेवटी आज गुन्हा दाखल करण्यात आला.  

हेही वाचा- एकीकडं आयटीयन्सना नोकरीची भीती, त्या आता या आजाराने ग्रासलं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajgurunagar Municipal Council files case against 6 employees