सहकार उभा करताना घेतलेले कष्ट विसरू नका

सहकार उभा करताना घेतलेले कष्ट विसरू नका
Published on

GHR26A09390
संगमनेर ः राजहंस दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात.

GHR26A09389
टीप- कोटमध्ये रणजितसिंह देशमुख यांचा फोटो घेणे

सहकार उभारण्यासाठीचे कष्ट विसरू नका
बाळासाहेब थोरात; राजहंस दूध संघाची वार्षिक सभा

संगमनेर, ता. १७ ः संगमनेरचा सहकार उभा करताना अनेकांनी मोठे कष्ट घेतले आहेत. गरिबांनी आपल्या कष्टातून उभा केलेला हा सहकार आहे. मात्र, आता काहीजण हाच सहकार उद्‍ध्वस्त करण्याची भाषा करीत आहेत. त्यांना तालुक्याची बसलेली घडी मोडायची आहे. त्यामुळे संगमनेर तालुका टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमच्या-आमच्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, पांडुरंग घुले, डॉ. जयश्री थोरात, शंकर खेमनर, सुधाकर जोशी, संपत डोंगरे, इंद्रजित थोरात, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, पंधराशे लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला राजहंस दूध संघ आज चार लाख लिटरपर्यंत दूध संकलन करीत आहे. प्रत्येक टप्प्यावर संघाने यशस्वी वाटचाल केली आहे. मुक्तसंचार गोठा आणि मुरघास ही राज्याला दिलेली आपली देणगी आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांची संस्था आपण जपली पाहिजे. राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड बनला आहे. ४९ वर्षांची संघाची वाटचाल यशस्वी राहिली असून, प्रत्येक टप्प्यावर आपण पुढे गेलो आहोत. गुणवत्तेमुळे गुलबर्गा, सुरत, चंद्रपूर, अमरावती आणि नागपूर आदी ठिकाणी राजहंस दुधाला मोठी मागणी आहे. आपण स्पर्धेत असल्यामुळेच खासगी दूध संकलक शेतकऱ्यांना चांगला भाव देत आहेत. ही शेतकऱ्यांची संस्था असून, तिचे मोठे संरक्षण तालुक्यातील नागरिकांना मिळत आहे. संघामुळे गरीब शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे.

कोट-
तुकाराम मुंडेंच्या भूमिकेला पाठिंबा
अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त
तुकाराम मुंडे यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. त्यांच्या कारवाईमुळे बनावट दूध निर्माण करणाऱ्यांना मोठी चपराक बसली असून, दूध संकलनात २० ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर भेसळयुक्त पनीरचे प्रमाणही कमी झाले आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यांच्या भूमिकेमुळे राजहंस दूध संघाची विक्री वाढली असून गुणवत्ता हेच आपले वैशिष्ट्य राहिले असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. तुकाराम मुंडे यांनी शासकीय स्तरावर कायम हा विभाग सांभाळावा.
– रणजीतसिंह देशमुख, अध्यक्ष, राजहंस दूध संघ, संगमनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com