भाजपाचे बारामती तालुका अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष राजकिरण शिंदे राजीनामा

संतोष आटोळे 
मंगळवार, 10 जुलै 2018

शिर्सुफळ - भारतीय जनता पक्षाच्या बारामती तालुका अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे अध्यक्ष अॅड. राजकिरण शिंदे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खुने व तालुकाध्यक्ष प्रविण आटोळे यांच्याकडे पाठवला आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रामध्ये वैयक्तिक अडचणी बरोबरच या पदावर राहून अनुसुचित जातीच्या घटकातील वर्गाला अपेक्षित न्याय देता येत नसल्याचे कारण दिले आहे. अॅड. शिंदे यांनी त्यांच्या कार्यकालात पक्षाच्या माध्यमातुन विविध सामाजिक कार्यक्रम, सार्वजनिक विकास मेळावे आयोजित केले. तसेच शासकीय दफ्तरी बहुजन वर्गाचे अनेक प्रलंबित मूलभूत प्रश्न मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पक्ष विस्तारासाठी पुढाकार घेतला.

त्यांच्या कार्यकाळात अनुसूचित जाती मोर्चाची जम्बो कार्यकारणी उभारली होती. मात्र असे असताना देखील त्यांना पक्षाकडून न्याय मिळत नसल्याची त्यांच्या कार्यकर्ते व समर्थक यांची अशी भावना आहे. आणि या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. 

या बाबत बोलताना शिंदे म्हणाले, तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पुढील निर्णय तालुक्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: Rajkiran Shinde, President of BJP's Baramati Taluka Scheduled Caste Morcha, resigns