

चाकण, ता. २२ : पावसाअभावी उत्पादनात झालेली घट आणि वाहतूक खर्चातील वाढीमुळे चाकणच्या किरकोळ बाजारात राजम्याच्या बाजारभावाने १६० रुपयांचा उच्चांक गाठला आहे. घाऊक बाजारातही दर सव्वाशे रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडत आहे.
बाजारात गेल्या महिन्यात ८० ते १०० रुपये किलो असलेला राजमा आता थेट १६० रुपयांवर गेला आहे. उत्तर भारतात उत्पादन घटल्याने पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारावर झाला असल्याचे विक्रेते मच्छिंद्र रामाने यांनी सांगितले. राजम्यासह हिरवी मिरची, टोमॅटो, शेवगा आणि भेंडीचे दरही ८० ते १०० रुपयांच्या घरात असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. प्रथिनांचा मुख्य स्रोत असलेल्या राजम्याचे भाव दुप्पट झाल्याने अनेक ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. उत्पादनातील तूट आणि वाढती मागणी यामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.