महाराष्ट्र मुंबई नगरसेवक परिषद संघटनेच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी राजश्री मखरे यांची निवड

Rajshree Makhre
Rajshree Makhre

इंदापूर - महाराष्ट्र मुंबई नगरसेवक परिषद या राज्य स्तरीय संघटनेच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती सौ. राजश्री अशोक मखरे यांची निवड झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे पाटील व राज्य सरचिटणीस कैलास गोरे पाटिल, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा ऍड. अरुणा डहाळे यांनी सौ. मखरे यांना नियुक्ती पत्र दिले आहे. या निवडीबद्दल वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, इंदापूर नगर- परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सौ. मखरे यांचे अभिनंदन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी सौ. मखरे म्हणाल्या, सदर संस्था राज्य पातळीवरील नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवक, नगरसेविका यांचे संघटन करून विविध मागण्या राज्य सरकारकडे करते. नगरसेवक मानधन वाढ, नगरसेवकांना समान निधी, नगरसेवकांना मंत्रालय प्रवेश त्यांच्याओळख पत्रावरच देण्यात यावा, पेन्शन देण्यात यावी आदी मागण्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे.

इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यक्षम नगरसेविका सौ. राजश्री मखरे यांची पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे शहरातील प्रलंबित विकास योजना व कामांना बळकटी मिळणार असल्याचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com