ठाकरेंना 25 हजार रुपये हेक्‍टरी मदतीचा विसर : राजू शेट्टी यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

पुणे : राज्यात अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झालेले असताना उद्धव ठाकरे यांनी हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली होती. पण आता त्यांचेच सरकार आल्यावर त्यांना याचा विसर पडला आहे. निधी नसल्याने ते केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. केंद्रानेही शेतकऱ्यांची निराशा केली, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : राज्यात अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झालेले असताना उद्धव ठाकरे यांनी हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली होती. पण आता त्यांचेच सरकार आल्यावर त्यांना याचा विसर पडला आहे. निधी नसल्याने ते केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. केंद्रानेही शेतकऱ्यांची निराशा केली, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता राजू शेट्टी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "भाजपने कर्जमाफी केल्याची थाप मारली. पण शेतकऱ्यांना त्यातून काहीच फायदा झालेला नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सत्तेय येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे सांगितले होते. या सरकारने केलेली कर्जमाफीही तकलादू आणि बिनकामाची आहे. केंद्र सरकारने तुरीचा हमीभाव 5 हजार 800 रुपये जाहीर केला आहे, पण बाजारात केवळ 4 हजार 300 रुपये मिळत आहे. सरकारने डाळ खरेदीसाठी व्यवस्था केलेली नाही. प्रती क्विंटल 1 हजार 500 रुपये नुकसान शेतकऱ्याला होत असून, त्याचे पैसे थेट बॅंकेत जमा करावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

Delhi Election : तिवारी म्हणाले होते 'ट्विट जपून ठेवा'; निकालनंतर होतायेत ट्रोल

स्वाभिमानीचा व्हेलंटाईन डे
राज्यातील ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. ग्रामीण विद्यार्थी अणि शहरी नागरिक यांच्यात प्रेमाचे संबंध निर्माण व्हावेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून "व्हॅलेंटाइन डे' साजरा केला जाणार आहे. त्यासाठी गुरूवारी सकाळी साडे दहा वाजता नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकापासून कृषी महाविद्यालयापर्यंत "प्रेम यात्रा' काढली जाणार आहे, त्यात नागरिकाना गुलाबाच्या फुलांचे वाटप केले जाणार आहे,'' असे शेट्टी यांनी सांगितले.

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया

आम्ही आप सोबत जाऊ शकतो
"भाजपने जाती-धर्मांत तेढ निर्माण करून, मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न दिल्लीच्या निवडणुकीत केला, पण आम आदमी पक्षाने शिक्षण, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांवर प्रचार केला. चांगला प्रशासक लाभला, तर मतदारही जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन विचार करतो, हे या निकालातून कळाले. आप आणि स्वाभिमानीचे जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मीच केजरीवाल यांना 20-13 मध्ये सांगलीत आणले होते. आमची मैत्री नैसर्गीक आहे, त्यामुळे आम्ही एकत्र येत्र शकतो, ही शक्‍यता कायम आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju shetty Criticism on CM Uddhav Thackeray in Pune