विरोधी पक्ष कसा असतो हे आता दाखवून देऊ : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 October 2019

विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल महाघाडीला मान्य आहे. कोल्हापूरकर हे चंद्रकांत पाटील यांना कळले नाहीत. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरकरांबाबत असे वक्तव्य केले. विरोधी पक्ष कसा असतो हे आता आम्ही दाखवून देऊ.

बारामती : महाराष्ट्रात नव्याने सत्तेत येणाऱ्या सरकारला सळो की पळो करून सोडू. विरोधी पक्ष कसा असतो, हे आता दाखवून देऊ, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

बारामतीतील गोविंदबागेत आज पवार कुटुंबीय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. हजारो कार्यकर्त्यांसह महाआघाडीतील प्रमुख नेते आणि नवनिर्वाचित आमदार याठिकाणी पवार कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आले होते.

प्रथमच गोविंदबागेत आलेले राजू शेट्टी म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल महाघाडीला मान्य आहे. कोल्हापूरकर हे चंद्रकांत पाटील यांना कळले नाहीत. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरकरांबाबत असे वक्तव्य केले. विरोधी पक्ष कसा असतो हे आता आम्ही दाखवून देऊ.

आगे आगे देखो होता है क्या : तटकरे
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आज पवार कुटुंबीयांची भेट घेत 
जनतेने दिलेला कौल मान्य असल्याचे सांगत आगे आगे देखो होता हे क्या असे सूचक विधानही केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty meets Sharad Pawar family in Baramati