

Rajvardhan Shinde Takes Charge as Someshwar Sugar Factory Chairman for Third Time Sangram Sorte Elected Vice Chairman Unopposed
esakal
वडगाव निंबाळकर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची गुरुवारी (दि. ५) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी निवड प्रक्रियेनंतर अधिकृत घोषणा केली. या निवडीनंतर जय पवार यांनी कारखान्याला भेट देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.