बंधनाच्या धाग्यांनी गुंफले अनोखे नाते!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे - बहीण-भावाच्या अतूट आणि हळव्या नात्याला रेशीम धागा बांधून अधिक दृढ करत घरोघरी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा झाला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने परगावाहून हजारो बहिणी रविवारी शहरात आल्या, तर अनेकांनी पुण्यातून परगावी, परदेशात राख्या पाठवून भावांना शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत विविध आकर्षक ऑफर्स असल्याने बहिणींनी औक्षण केल्यानंतर भावांनी झक्कास गिफ्ट देत बहिणींना खूश केले. काही ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत सैनिक, रिक्षावाले, बसचालक, पोलिस कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना राख्या बांधत आपुलकीचा बंध जोडला गेला. 

देशाचे रक्षण करणारे सैनिक, देशांतर्गत नागरिकांचे संरक्षण करणारे पोलिस, तसेच आपल्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या वृक्षांना राखी बांधून शहरातील विविध संस्था, संघटनांनी रक्षाबंधन उत्साहात साजरे केले.

खडकीतील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील सैनिकांना कलाकार आणि कार्यकर्त्यांनी राख्या बांधल्या. अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने सैनिकांना औक्षण करून त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी केंद्राचे प्रमुख पी. आर. मुखर्जी, कर्नल बी. एल. भार्गव, सैनिक मित्र परिवारचे अशोक मेहेंदळे 
उपस्थित होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झाडांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, उपमुख्याध्यापिका जयश्री रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत बारा बलुतेदारांसह समाजाला सहायक ठरणाऱ्या व्यावसायिकांबरोबर रक्षाबंधन साजरे करण्यात आले. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी या वेळी 
मार्गदर्शन केले. 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांच्या पुढाकाराने दत्तवाडी पोलिस ठाण्यात पोलिसांना  राख्या बांधण्यात आल्या. या उपक्रमात महेश ढवळे, सागर आरोळे, धनंजय कांबळे सहभागी झाले होते. शिवसाम्राज्य वाद्य पथकातर्फे कर्वेनगर येथील अलंकार पोलिस ठाण्यात राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, इब्राहिम पिंजारी, पथक प्रमुख अक्षय बलकवडे, प्रदीप हुलावळे उपस्थित होते. जयराज ग्रुपच्या वतीने केयुल शहा आणि इलिशा शहा यांनी हमाल कामगार आणि ग्रुपमधील सदस्यांना राख्या बांधून सण साजरा केला. स्वच्छ आणि लोकायत संस्थेतर्फे कचरावेचकांसमवेत रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

ऑनलाइन रक्षाबंधन
अमेरिकास्थित विनया पवार-मेश्राम हिने पुण्यात राहणाऱ्या भावांसमवेत अनोख्या पद्धतीने ऑनलाइन रक्षाबंधन साजरे केले. ‘‘गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी न्यूयॉर्कमध्ये आहे; परंतु दरवर्षी रक्षाबंधनाला मी ऑनलाइन राखी खरेदी करते. रक्षाबंधनाच्या दिवशी मी माझ्या तिन्ही भावांशी स्काइप किंवा व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधते आणि आम्ही हा सण साजरा करतो,’’ असे विनयाने सांगितले. रविवारी तिने अमेरिकेतून ‘स्काइप’द्वारे सण साजरा केला.

Web Title: Rakshabandhan