बारामतीत मूक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

बारामती शहर - जम्मू काश्‍मीरमधील कथुआ येथील आठ वर्षीय आसिफा, उत्तरप्रदेशमधील उन्नाव आणि सुरत येथील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नागरिक व विविध संघटनांसह अखंड भारत जनजागृती मोर्चाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवत मूकमोर्चाला पाठिंबा दिला.

मुजावरवाडा येथून सुरू झालेला हा मोर्चा कसबा, गुणवडी चौक, गांधी चौक येथून भिगवण चौकात आला. नागरिकांसह विविध संघटना, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला. नगर परिषदेसमोर मोर्चाची सांगता करण्यात आली. मुलीने कविता सादर करत पीडित मुलींची व्यथा मांडली. संबंधित गुन्हेगाराच्या समर्थनार्थ मोर्चा काढणे ही देशातील मुलींच्या मातापित्यांचा आणि संविधानाचा अपमान असल्याची भावना अलिशा नसीर बागवान या विद्यार्थिनीने व्यक्त केली. मागण्यांचे निवेदन खुदैजा सिकंदर शेख या विद्यार्थिनीने वाचून दाखवले. प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी निवेदन स्वीकारले. 

Web Title: rally in baramati for aasifa justice