Ayodhya Ram Mandir : लष्कर भागात राम प्राणप्रतिष्ठा उत्साह साजरी

लष्कर भागातील कोहिनूर चौकात नवयुग सुवर्णकार तरुण मंडळाच्या वतीने राम पूर्णाकृती पुतळ्याचा स्थिर देखावा साकारण्यात आला. यावेळी भजन, कीर्तन व पथक मिरवणूक काढण्यात आली. तसेच नागरिकांना शिरा वाटप करण्यात आला.
pune
punesakal

कँटोन्मेंट: लष्कर भागातील कोहिनूर चौकात नवयुग सुवर्णकार तरुण मंडळाच्या वतीने राम पूर्णाकृती पुतळ्याचा स्थिर देखावा साकारण्यात आला. यावेळी भजन, कीर्तन व पथक मिरवणूक काढण्यात आली. तसेच नागरिकांना शिरा वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष धनराज पिल्ले, झेवियर थॉमस, अजय भांबूरे व राजू पाहाडीया आदींनी केले.

pune
Ayodhya Ram Mandir : कोल्हापुरातल्या या डोंगरात प्रभू श्रीरामांनी केलेला चमत्कार आजही पहायला मिळतो!

15 ऑगस्ट चौक मित्र मंडळ च्या वतीने होमहवन प्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन निलेश कणसे, संजय चव्हाण, निलेश कोल्हे, अनिल निंबाळकर आदींनी यांनी केले.भारत भगत आखाडा वीर गोगदेव यांच्या वतीने होम हवन आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन भारत भगत यांनी केले. कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव व महिला मंडळाच्या वतीने रामायण वर आधारित सुंदर कांड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाआरती व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष कैलास भोज, महिला अध्यक्षा वनजा बिल्लमपेल्ली, अमोल केदारी आदींनी केले.

किशोर सिंघवी यांच्या वतीने आयोध्या येथील हुबेहूब छोटे श्रीरामाचा हालाता देखावा सादर केला. यावेळी लब्दी सिंघवी या छोट्या कन्येने श्रीरामाचा पेहराव परिधान करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. शिंपी आळीतील जय जवान मंडळाने भगवान श्रीरामाचा राज्याभिषेक सोहळ्याचे दृश्य साकारले होते. शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने मदिरांचे तैलचित्र लावून सजावट करण्यात आले. यावेळी राजेश श्रीगिरी, प्रियांका श्रिगिरी, डॉ वैष्णवी किराड आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

नवयुग तरुण मंडळाने महाआरती, दीप उत्सव, रांगोळी आणि प्रसादाचे वाटप केले. श्री नवचैतन्य मंडळांनी आलेल्या सर्व राम भक्तांचे स्वागत केले. श्री नामदेव शिंपी समाज राम मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी काकड आरती, रामजप, प्राणप्रतिष्ठेचे लाईव्ह प्रक्षेपण, महाआरती करण्यात आले. आयोध्यातील आलेल्या अक्षदा सर्व भाविकांना देऊन मंदिरात राम मंदिरात वाहण्यात आली. अध्यक्ष प्रदीप खोले व कविता खोले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.संजय कांबळे, लता कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.

अमर मित्र मंडळाने कार सेवकांचा सत्कार केला. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिरिश आगुरेड्डी, प्रशांत भोईड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सोलापूर बाजार राममंदिरात जयकुमार जाया यांनी संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई केली होती. प्राणप्रतिष्ठेनंतर महापूजा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच स्नेहसंवर्धक मंडळात गेल्या आठ दिवसापासून माजी नगरसेवक विवेक यादव व युवा नेता संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल शिंदे व कार्यकर्त्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले. उत्सव संवर्धक संघ आणि नवजीवन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोदीखाना परिसरात महिलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन अतुल गायकवाड व गोपी राठोड यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com