#EID जुन्नर शहर व परिसरात रमजान ईद उत्साहात  

दत्ता म्हसकर
शनिवार, 16 जून 2018

जुन्नर - जुन्नर शहर व परिसरात सामूहिक नमाज पठण व विविध धार्मिक कार्यक्रमाने रमजान ईदचा सण साजरा करण्यात आला.जुन्नर शहरातील दिवाणे अहेमद मशिदी पासून हाफिज मौलाना इमरान बेग यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीने मुस्लिम बांधव सामूहिक नमाज पठणासाठी ईदगाह मैदानावर जमा झालेनंतर सामुदायिक नमाज पठण केले.  

जुन्नर - जुन्नर शहर व परिसरात सामूहिक नमाज पठण व विविध धार्मिक कार्यक्रमाने रमजान ईदचा सण साजरा करण्यात आला.जुन्नर शहरातील दिवाणे अहेमद मशिदी पासून हाफिज मौलाना इमरान बेग यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीने मुस्लिम बांधव सामूहिक नमाज पठणासाठी ईदगाह मैदानावर जमा झालेनंतर सामुदायिक नमाज पठण केले.  

नमाज पठणानंतर आमदार शरद सोनवणे, तहसीलदार किरण काकडे, पोलिस अधिकारी राम पठारे यांनी गुलाब पुष्प देउन ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर ईदगाह कमिटीच्या वतीने राष्ट्रीय एकता मंचचे अध्यक्ष हाजी मिर्झा कुद्दुस बेग, नगरसेवक जमिर कागदी यांनी मुस्लिम समाजाच्या वतिने आमदार सोनवणे, संजय काकडे, राम पठारे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, यांचा सत्कार केला.  

शहरातील पिरजा देवाडा, खलीलपुरा, माईमोहल्ला, दिवाणे अहेमद संगतराश, कादरीया मशीद, जुम्मा मशीद या प्रमुख मशिदीमध्ये अनुक्रमे मौलाना सुफियान हाफिज, मौलाना रिजवान कुरेशी, सादिकुल ईस्लाम, मौलाना रफिक, हाफिज इदरिस रब्बानी, हाफिज मोहसिन व मौलाना नहिद रजा यांनी सर्वात नंतर ईदगाह मैदान येथे हाफिज मौलाना इमरान बेग यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाज पठण व दुवा पठणाचा मुख्य कार्यक्रम झाला. 

नमाज पठणाला मिरवणुकीने जाताना नगराध्यक्ष शाम पांडे, नगर सेवक दिनेश दुबे, दीपेश परदेशी, समीर भगत, अविनाश करडिले नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी पालिका कार्यालयासमोर मिरणुकीत सामील मौलाना, धर्मगुरु व मुस्लिम बांधवाचे पुष्प देवून स्वागत केले.जातीय सलोखा, एकमेकांच्या धर्माचा आदर व सन्मान करीत  भाईचारा कायम ठेवुन देश व मानव जातीच्या उत्कर्षासाठी आपल्या परिसरात शांतता कायम राहण्यासाठी अग्रेसर रहा असे आव्हान मौलाना हाफिज बेग यांनी यावेळी केले.  

आमदार शरद सोनवणे यांनी ईदगाह मैदान तसेच तालुक्यातील विविध दर्गा, कबरस्थानच्या विकासासाठी निधि उपलब्ध करुन देणा असल्याचे सांगितले. सामूहिक दुवा पठण झाल्यानंतर सांगता झाली. 

दरम्यान बादशहा तलाव येथे बिलाली मशिदीत मौलाना शाकिब रजा यांच्या नेतृत्व खाली नमाज पठण झाले. चिंचोली गावच्या मुख्य मशिदीत नमाज व दुवा पठण कार्यक्रम झाला.  यावेळी आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके, गटनेत्या आशा बुचके, माजी नगराध्यक्ष किरण परदेशी, माजी उपनगराध्यक्ष सलिम गोलंदाज, नगर सेवक जमीर कागदी, फिरोज पठाण, वल्लभ पतसंस्थेचे अध्यक्ष सी.बी.गांधी, अतुल पतसंस्थेचे अध्यक्ष हाजी अब्दूल कादर इनामदार, राष्ट्रवादी काँगेसचे शहराध्यक्ष पापा खोत, ॲड अजिज खान, ॲड फारूख पठाण, माजी नगर सेवक मधुकर काजळे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. नमाज पठणानंतर हिन्दू-मुस्लिम बांधवानी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramadan Id in the city and surroundings of Junnar